भगवान महावीर स्वामी यांच्या 2623 व्या जन्म-कल्याणक महोत्सवानिमित्त मतदान जनजागृती रॅली

Jalgaon News : श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती 2024 यांच्या माध्यमातून सकल दिगंबर जैन समाजाच्या विश्व शांती, सदभावना व मतदान जनजागृती मोटारसायकल रॅलीने भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ झाला. पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर खानदेश सेंट्रलच्या प्रांगणापासून सदरची रॅली सुरु झाली होती.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, माजी खासदार ईश्वरलाल ललवाणी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, उद्योजक रजनीकांत कोठारी, अजय ललवानी, जन्म कल्याणक समितीचे अध्यक्ष पारस राका, स्वरूप लुंकड, जितेंद्र चोरडिया, ललित लोडाया, चंद्रशेखर राका, आदर्श कोठारी, श्रेयस कुमट, नितिन चोपडा, विनय पारख, अनीश शहा, प्रदीप मुथा, प्रवीण पगारिया, चंद्रकांता मुथा, प्रवीण छाजेड, मनीष लुंकड, मीनल जैन आदी उपस्थित होते. पगारिया ऑटोकडून नवीन बजाज चेतक वाहन उपलब्ध करून दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.रेड्डी यांनी मतदानाचा टक्का वाढावा आणि निर्भयपणे मतदान करावे म्हणून सर्व उपस्थितांना शपथ दिली. शपथ ग्रहण केल्यानंतर रॅलीला आरंभ झाला. मोठ्या संख्येने उत्साहाने रॅलीत दुचाकी स्वार सहभागी झाले होते. दुचाकीस्वार मतदार जागृती, विश्र्वशांती आणि पर्यावरण संवर्धन होण्यासाठी फलक दर्शवित होते. विविध वेशभुषा आणि वाहन सजावट करून सहभागी झालेले महिला मंडळ आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button