Jalgaon News : नेपाळ बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २७ जणांचा मृत्यू; आज मृतदेह विमानाने आणणार..!
Jalgaon News : नेपाळमध्ये नदीत बस कोसळ्याने जळगाव जिल्ह्यातील एकूण २७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना काल शुक्रवारी घडली. अपघातातील मृतांपैकी १६ जणांची आतापर्यंत ओळख पटली असून, आज शनिवारी (ता.२४) सर्व मृतदेह विमानाने नाशिक येथे आणले जाणार आहेत. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
Jalgaon News : 27 people died in Nepal accident in Jalgaon district; Today the body will be brought by plane..!
तनहुन जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता सदरचा अपघात झाला. बस पोखराहून काठमांडूला जात होती. यावेळी ती चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन खोल नदीत पडली. या अपघातातील बहुतांश भाविक हे जळगाव जिल्ह्याचे असून, जळगावचे जिल्हाधिकारी यूपीतील महाराजगंजच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बसच्या अपघातात एकूण २७ जणांचा मृत्यू झाला असून, १६ जण गंभीर जखमी आहेत. सर्व भाविक भुसावळ तालुक्यातील आहेत.
ओळख पटलेल्या मृतांची अशी आहेत नावे
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७ भाविकांपैकी १६ भाविकांची आतापर्यंत ओळख पटली आहे. त्यात रामजीत उर्फ मुन्ना, सरला सुहास राणे (वय ४२), भारती प्रकाश जावळे (वय ६२), तुळशीराम तावडे (वय ६२), सरला तावडे (वय ६२), संदीप राजाराम सरोदे (वय ४५), पल्लवी संदीप सरोदे (वय ४३), अनूप हेमराज सरोदे (वय २२), गणेश पांडुरंग भारंबे (वय ४०), नीलिमा सुनील धांडे (वय ५७), पंकज भागवत भंगाळे (वय ४५), परी गणेश भारंबे (वय ०८), अनिता अविनाश पाटील (वय ५०), विजया कडू जावळे (वय ५०), रोहिणी सुधाकर जावळे (वय ५१), प्रकाश नथ्थू कोळी (वय ५०) यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
दरम्यान, नेपाळमधील बस अपघाताची माहिती मिळाल्यानंतर देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे.