जळगाव जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरणाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुरुवात
Jalgaon News : जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी (ता.03 मार्च) सकाळी नवजात बालकांना ‘दो बुंद’ पोलिओ लसीचा डोस देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर आदी उपस्थित होते. देशभरात 3 मार्च रोजी पल्स पोलिओचे नवजात पालक ते पाच वर्षापर्यंत बालकांना डोस देण्यात येतो. जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे डॉक्टर आणि अन्य कर्मचारी यांच्या नियोजनात हे काम सुरु आहे. सदरची मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.