पाचोरा, भडगाव तालुक्यातील पर्यटन स्थळांना सुमारे तीन कोटींची प्रशासकीय मान्यता

Jalgaon News : पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व भडगाव तालुक्याच्या कामांसाठी सुमारे 294.47 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देऊन पैकी 88.34 लक्ष निधी जिल्ह्याधिकाऱ्यांना वितरीत करण्यात आला होता. संबंधित सर्व कामांची प्रशासकीय मान्यता रद्द करून त्याऐवजी अन्य कामांसाठी आता सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालयाने मान्यता दिल्यानुसार, पाचोरा तालु्क्यातील वाणेगाव येथील राधाकृष्ण मंदिर देवस्थानावर सभामंडप बांधण्यासाठी 30 लाख रूपयांच्या निधीला सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय वाणेगाव येथीलच राधाकृष्ण मंदिरास संरक्षण भिंत व प्रवेशद्वार बांधण्यासाठी 30 लाख रूपये, स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी 30 लाख रूपये, मुख्य रस्ता काँक्रिटीकरणासाठी 30 लाख रूपये, मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी 30 लाख रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे मारोती मंदिर परिसरात विविध सोयी व सुविधा, सुशोभीकरणासाठी 45.47 लाख रूपये निधीला मान्यता मिळाली आहे.

भडगाव तालुक्यातील कजगाव येथे श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी 17 लाख रूपये तसेच मंदिरास संरक्षण भिंत बांधण्यासाठी 17 लाख रूपये, स्वच्छतागृह बांधण्यासाठी 16 लाख रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय पिचर्डे येथील जगत जननी माता मंदिर देवस्थानावर सभामंडप बांधणे व सुशोभीकरणासाठी 49 लाख रूपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button