Jalgaon News : बैलांना पाणी पाजण्यास गिरणा नदीवर गेलेल्या खेडीच्या शेतकऱ्याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू…!

Jalgaon News : गावालगतच्या गिरणा नदीच्या पात्रात बैलांना पाणी पाजण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खेडी खुर्द (ता.जळगाव) येथे घडली. ईश्वर सोमा कोळी (वय ३२) असे त्यांचे नाव असून, तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या मृत्युनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Jalgaon News : A village farmer who went to Girna river to give water to the bullocks died due to drowning…!

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, खेडी खुर्द येथील शेतकरी ईश्वर कोळी यांची शेती गिरणा नदीच्या काठावरच आहे. शेतीची कामे आटोपून कोळी हे तहानलेल्या बैलांना पाणी पाजण्यासाठी गिरणा नदीच्या पात्रात सोमवारी (ता.२६) गेले होते. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीच्या पाण्यात बुडाले. दोन्ही बैल पाणी पिल्यानंतर सायंकाळी थेट घरी परतले. त्यांच्यासोबत ईश्वर कोळी नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी सगळीकडे रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केली. प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.२७) गिरणा नदीच्या पात्रात ईश्वर कोळी यांचा मृतदेह आढळून आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात रवाना करण्यात आला. त्याठिकाणी मृताच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. शवविच्छेदनानंतर शेतकरी ईश्वर कोळी यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

WhatsApp Group

जितेंद्र पाटील (मुख्य संपादक)

गेल्या 24 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सकाळ-ॲग्रोवनमध्ये खान्देशातील बातमीदारीचा मोठा अनुभव. लोकसत्ता तसेच लोकमत, दिव्य मराठी वृत्तपत्रातही विपुल लिखाण केले आहे. प्रिंट मीडियासह यूट्युब, फेसबुक आणि आता वेब पोर्टलवर सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील. शेतीविषयी लिखाणात हातखंडा राहिला आहे. सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित.

Related Articles

Back to top button