Jalgaon News : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर..!
Jalgaon News : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे आज शुक्रवारी (ता.२३ ऑगस्ट) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते चाळीसगाव, भुसावळ आणि रावेर-यावल विधानसभा मतदार संघात भेटी देणार आहेत. संभाव्य उमेदवारांची चाचपणी देखील ते आपल्या दौऱ्यात करणार आहे. पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी त्यानुसार नियोजन केले आहे.
Jalgaon News : President of Prahar Janashakti Party MLA Bachu Kadu on a visit to Jalgaon district today..!
विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना प्रहार जनशक्ती पक्षाने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. हा पक्ष काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. छत्रपती संभाजीनगरातील आक्रोश मोर्चाच्या गर्दीने संपूर्ण राज्याचे लक्ष प्रहार संघटनेकडे वेधले गेले होते. आ.बच्चू कडू यांनी सरकारला वेळ दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास सप्टेंबरमध्ये मुंबईत मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. दरम्यान, आ. कडू यांचा एकदिवसीय दौरा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तो महत्वाचा मानला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधव, प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आ.बच्चू कडू जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचे सकाळी चाळीसगाव येथे आगमन होईल. एका उद्घाटन समारंभाला भेट देऊन ते पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर ते भुसावळ येथे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या घरी भेट देणार असून जळगावसह भुसावळ येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर ते यावलकडे प्रस्थान करतील. रावेर येथे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यावर सावदा येथे महिलांसाठी आयोजित स्नेह संवाद मेळाव्याला ते संबोधित करतील.