Jalgaon News : पंतप्रधानांचा दौरा; जळगाव विमानतळावरून ‘या’ दिवशी व्यावसायिक विमानांच्या उड्डाणावर बंदी..!

Jalgaon News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जळगाव विमानतळापासून ५० किलोमीटर क्षेत्र २२ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट कालावधीत ‘नो फ्लाईंग झोन’ घोषीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे २४ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेपासून २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विमानतळावरील सर्व व्यावसायिक उड्डाणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

Jalgaon News : Prime Minister’s Tour; Commercial flights banned from Jalgaon airport for 20 hours..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २५ ऑगस्ट रोजी जळगाव येथे ‘लखपती दीदी’ कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने जळगाव विमानतळापासून ५० किमीच्या परिघात, “205741N”, “0753729E” आणि वरील निर्देशांकाच्या जमिनीपासून ४००० फूट अंतरावर २२ ऑगस्ट ते २५ ऑगस्टपर्यंत “नो फ्लाइंग झोन” घोषीत केल्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत. या आदेशात ड्रोन, पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट्स, खाजगी हेलिकॉप्टर, पॅरामोटर, हॉट एअर फुगे इत्यादींच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव दौऱ्याशी संबंधित महत्वाच्या/अति महत्वाच्या विमानांची उड्डाणे वगळता व्यावसायिक विमानांची उड्डाणे २४ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेपासून २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, असेही आदेशात म्हटले आहे. यामुळे जळगावहून बाहेरच्या राज्यात तसेच पुणे, मुंबई ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button