Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या तोंडाला केंद्र सरकारने अखेर पुसली पाने !

पाठपुरावा करण्यात राज्य शासन ठरले अपयशी

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील सुमारे ६,६०९ केळी उत्पादकांना पिकविम्याची प्रलंबित रक्कम मिळवून देण्यासाठी काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने बैठक आयोजित करून केंद्राकडे पाठपुरावा केला होता. प्रत्यक्षात केंद्र सरकारने जळगावच्या जवळपास सर्व शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम देण्यास सपशेल नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, केळी उत्पादकांना पिकविम्याची रक्कम मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या राज्यातील सत्ताधारी पक्षावर विरोधकांनी आता टीकेची झोड उठवली आहे.

Jalgaon News: The central government has wiped the face of 6 thousand banana producers in Jalgaon district!

जळगाव जिल्ह्याच्या केळी उत्पादकांना हवामानावर आधारीत फळपीक विम्याची रक्कम मिळणार नसल्याची भूमिका मागे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केली होती. त्यानंतरही जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृषिमंत्री व कृषी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा खटाटोप केला होता. दरम्यान, केळी पिकविम्यापासून वंचित राहिलेल्यांपैकी १० टक्के शेतकऱ्यांची प्रातिनिधीक पडताळणी एमआरसॅक सॅटेलाईट प्रणालीद्वारे करण्याचे ठरले देखील होते. त्यानंतर प्राप्त झालेल्या डेटाच्या आधारे उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पिकविमा रकमेची भरपाई देण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात सुमारे ६,६८६ केळी उत्पादक शेतकऱ्यांपैकी फक्त ७७ शेतकऱ्यांनाच न्याय मिळाला. उर्रित ६,६०९ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत गुंतलेल्या सत्ताधाऱ्यांचे हे सर्वात मोठे अपयश

दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे ६,६०९ केळी उत्पादकांना पिकविम्याची प्रलंबित रक्कम देण्यास केंद्र सरकारने नकार दिल्यानंतर जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी जोरदार टीका महायुतीच्या सरकारवर केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत गुंतलेल्या सरकारचे हे सर्वात मोठे अपयश असल्याचा आरोप सुद्धा माजी खासदारांनी यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींकडून ज्या पद्धतीने पाठपुरावा करण्याची गरज होती, त्या पद्धतीने करण्यात आला नाही. जिल्ह्यात आधीच ठिबकचे अनुदान थकले आहे. कापसाचा विमा मिळालेला नाही. त्यानंतर आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना हवामानावर आधारीत पिकविम्याच्या लाभापासून वंचित ठेवले गेले आहे, असेही उन्मेश पाटील यांनी म्हटले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button