Jalgaon News : मंत्री अनिल पाटलांना वैतागलेल्या २० पदाधिकाऱ्यांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश !

Jalgaon News : कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरलेले मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना वैतागून राजीनामा देणाऱ्या युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुमारे २० पदाधिकाऱ्यांनी आज शनिवारी (ता.१७) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे पक्षाच्या वतीने स्वागत केले.

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीची भावना पसरली होती. पक्ष नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांची कामे केली जात नाही. समस्या सोडविण्यासाठी देखील प्रयत्न होत नाही. कार्यकारीणीतील दोन पदाधिकाऱ्यांची परस्पर नियुक्ती केली, अशी तक्रार करून अजित पवार युवक काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांचेसह युवक कार्याध्यक्ष साहील पटेल, युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख रफीक पटेल, युवक उपाध्यक्ष अमोल बाविस्कर, मनोज पाटील, इब्राहिम खाटीक, सरचिटणीस योगेश महाजन, मयूर पाटील, सूर्यकांत भामरे, युवक चिटणीस अमर येवले, शहर संघटक चेतन परदेशी, राहूल कोळी, गोपी सोनार, चेतन परदेशी, चिटणीस आदित्य गुळवे, किरण गव्हाणे, गौरव डहाके, देवेंद्र पाटील, अबू भालेराव, अमोल पाटील, प्रशांत पाटील, भैया पाटील आदींनी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याकडे राजीनामा दिला होता. संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांनी आज शनिवारी जळगावात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश करून अजित पवार गटाला मोठा धक्का दिला.

यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलीक आदींसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button