jalgaon News : किनोद येथे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक भुईकाट्याचे भूमिपूजन

jalgaon News : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या किनोद येथील उपबाजार आवारात आज गुरूवारी (ता.१५) स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते ८० टन इलेक्ट्रॉनिक भुईकाट्याचे भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान, परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी भूईकाटा अद्ययावत करण्यात येत असल्याबद्दल यावेळी समाधान व्यक्त केले.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून किनोद येथील उपबाजार आवारात भोकरसह भादली, आमोदा, गाढोदा, पळसोद, फुपनी, जामोद, करंज, सावखेडा परिसरातील केळी उत्पादकांच्या सोयीसाठी यापूर्वीच इलेक्ट्रॉनिक भुईकाटा बसविण्यात आला होता. त्यास अद्ययावत करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न आता बाजार समितीकडून करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ८० टन इलेक्ट्रॉनिक भुईकाट्याचे भूमिपूजन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे हस्ते स्वातंत्र्य दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आले.

याप्रसंगी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्यामकांत सोनवणे तसेच संचालक जयराज चव्हाण, योगराज सपकाळे, दिलीप कोळी, अरूण पाटील, पांडुरंग पाटील, भैयासाहेब पाटील, माजी जि.प.सदस्य जितेंद्र देशमुख, चेतन सोनवणे, योगेश पाटील, कुमार पाटील व पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button