Jalgaon News : लाडक्या बहि‍णीच्या भोजनावर खर्च १५० रूपये; प्रत्यक्षात दिली बिस्कीटे, पाण्याची बाटली !

जळगावमधील मेळाव्यातील खळबळजनक प्रकार

Jalgaon News : लाडकी बहीण योजनेच्या संभाव्य लाभार्थी महिलांशी संवाद साधण्यासाठी जळगावात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य मेळाव्याचे आयोजन मंगळवारी (ता.१३) करण्यात आले होते. या मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या जिल्हाभरातील महिलांच्या भोजनासाठी प्रत्येकी १५० रूपयांची तरतूद जिल्हा नियोजन समितीतून केली होती. प्रत्यक्षात मेळाव्याच्या ठिकाणी महिलांना भोजनाऐवजी फक्त बिस्किटे आणि पाण्याची बाटली मिळाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Jalgaon News : Beloved sister spends Rs 150 on food; Chivda and biscuits actually given!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी संवाद साधण्यासाठी आयोजित जळगावमधील मेळाव्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ आदी उपस्थित होते. शहरातील सागर पार्कवर आयोजित या मेळाव्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे १ कोटी ९० लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यातील जवळपास ९३ लाख रूपये खर्च हा फक्त मंडप, व्यासपीठ, बैठक व्यवस्था आणि ध्वनी यंत्रणेवर करण्यात आला होता. याशिवाय जिल्हाभरातून उपस्थित राहिलेल्या महिलांना मेळाव्याच्या ठिकाणी भोजन देण्यासाठी प्रत्येकी १५० रूपयांच्या थाळीची व्यवस्था करण्यात आली होती.

मेळाव्याच्या ठिकाणी काही महिलांना तर पाणीही मिळाले नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सागर पार्क मैदानावर झालेल्या मेळाव्यासाठी आलेल्या महिलांना भोजनासाठी प्रत्येकी १५० रुपये जिल्हा प्रशासनाकडून देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्या महिलांना चिवडा, बिस्किटे व पाण्याची बाटली फक्त मिळाली. काही महिलांना तर पाणीही मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. डोममध्ये जागा अपूर्ण पडल्याने उन्हात बसूनच बहुतांश महिलांना मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकावे लागले. आधीच महिलांना १२ वाजेपासून बसवून ठेवले होते. त्यात मंडपात पंखे किंवा कुलरची कोणतीच व्यवस्था नसल्याने घामाघूम झालेल्या महिलांनी मेळावा संपल्यानंतर बाहेर स्व खर्चाने चहा घेतला. लाडक्या बहिणींमध्ये त्यामुळे आयोजकांबद्दल तीव्र नाराजीची भावना दिसून आली. यासंदर्भात वृत्त दिव्य मराठीनेही प्रकाशित केले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button