Jalgaon News : ‘चालीसगाव शहर में एक घर बनाऊँगा’…पारोळ्याच्या करण पाटलांनी केला निर्धार पूर्ण !

Jalgaon News : लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदारकीचा राजीनामा देऊन मित्र करण पाटील यांच्यासाठी उन्मेश पाटील यांनी जंगजंग पछाडले होते. आपल्यासाठी खासदारकीचे बलिदान देणाऱ्या त्याच मित्रासाठी म्हणजे उन्मेश पाटील यांच्यासाठी आता करण पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत बाजी लावण्याची तयारी केली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांना रोखण्यासाठी पाटील यांनी थेट चाळीसगावातच आता तीन महिन्यांसाठी भाड्याने घर घेतल्याचेही सांगितले जात आहे.

Jalgaon News : ‘We will build a house in Chalisgaon city’…Paroa’s Karan patil determination!

लोकसभेच्या निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आल्यानंतर तत्कालिन खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. याशिवाय आपले मित्र पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पाटील-पवार यांना ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली होती. करण पाटील आणि उन्मेश पाटील यांच्या जोडीने भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी थेट पंगा घेतल्याने जळगावमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत मोठी चुरस देखील निर्माण झाली होती. निवडणुकीत भाजपसमोर निभाव लागलेला नसला, तरी करण पाटील लोकसभेच्या उमेदवारीमुळे घराघरात मात्र पोहोचले.

करण पाटलांची उन्मेष पाटलांसाठी काहीपण करण्याची तयारी…

दरम्यान, लोकसभेत मित्र उन्मेष पाटील यांनी केलेली मोठी मदत लक्षात ठेवून त्यांना आता विधानसभेत चाळीसगावमध्ये त्यांना मदत करण्यासाठी कोणतीच कसर न ठेवण्याचा निर्धार करण पाटील यांनी केला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांना रोखण्यासाठी रात्रीचा दिवस करण्याकरीता थेट चाळीसगाव शहरातच त्यामुळे पाटील यांनी आता भाड्याने घर घेतल्याचे बोलले जात आहे. दोन्ही पाटील एकत्र येऊन भिडल्यास त्यांचा सामना आमदार मंगेश चव्हाण कसा करतात, त्याकडे संपूर्ण चाळीसगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.

स्मिता वाघांना चाळीसगावमधून 16 हजार 327 मतांची होती आघाडी

भाजपच्या लोकसभा उमेदवार स्मिता वाघ यांना चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून सुमारे एक लाखांचे मताधिक्य देण्याचा निर्धार आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. परंतु, प्रतिस्पर्धी उमेदवार करण पाटील यांच्यासाठी माजी खासदार उन्मेश पाटील यांनीही मोठी ताकद लावली. त्यामुळे भाजपला चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रयत्नानंतरही फक्त 1,05,260 मते मिळवता आली. तुलनेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील यांना 88,933 मते मिळाली. फक्त 16 हजार 327 मतांची आघाडी भाजप उमेदवार स्मिता वाघ यांना चाळीसगावमधून मिळाली होती.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button