Jalgaon News : माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी असोदा, भादली, सुजदे, भोलाणेच्या विद्यार्थ्यांसाठी गाठले एसटीच्या विभाग नियंत्रकांचे कार्यालय

Jalgaon News : जळगाव तालुक्यातील असोदा, भादली, सुजदे, भोलाणे, देऊळवाडे येथील विद्यार्थी व प्रवासी अनियमित बससेवेमुळे गेल्या काही दिवसांपासून खूपच त्रस्त झाले होते. त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अखेर आज स्वतः थेट एसटीच्या विभाग नियंत्रकांचे कार्यालय गाठले. त्यांना बसेस संदर्भातील समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी देखील केली.

Jalgaon News : Former Minister Gulabrao Deokar reached the office of the Divisional Controller of ST for the students of Asoda, Bhadli, Sujde, Bholane.
जळगाव आगारातून असोद्यासह, भादली, सुजदे, भोलाणे, देऊळवाडे गावांसाठी सोडण्यात येणाऱ्या बसेसच्या काही फेऱ्या कमी करण्यात आलेल्या असून, ज्या काही बस सध्या सुरू आहेत त्यासुद्धा वेळेवर धावत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. अनेकवेळा सूचना देऊनही कार्यवाही होत नाहीए. यापूर्वी असोदा मार्गावरील शेवटची बस रात्री १० वाजता सुटायची. त्यामुळे बाहेरगावाहून रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांची सोय व्हायची. मात्र, सदरची बस सध्या बंदच असून ती पूर्ववत सुरू करावी. इतरही बसेसच्या फेऱ्या नियमित कराव्यात. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, अशा आशयाचे निवेदन विद्यार्थी व प्रवाशांच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना माजी मंत्री देवकरांकडून देण्यात आले.

यावेळी खेमचंद्र (राजू ) महाजन, हेमंत पाटील, संजय पाटील, पंडीत पाटील, गोकुळ चव्हाण, धवल पाटील आदींसह असोदा, भादली, सुजदे, देऊळवाडे, भोलाणे परिसरातील असंख्य विद्यार्थी व प्रवाशी उपस्थित होते. दरम्यान, विभाग नियंत्रकांनी एसटी बसेसच्या फेऱ्यांविषयीच्या समस्या तातडीने सोडविण्याची ग्वाही दिली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button