Jalgaon News : माजी पोलिस अधीक्षकांच्या जबाबाने गिरीश महाजनांचे ‘ते’ प्रकरण पुन्हा चर्चेत !

Jalgaon News : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावर दोनवेळा दबाव आणला होता, असा जबाब जळगावचे माजी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सीबीआयला दिलेला होता. दरम्यान, सीबीआयने त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र पुणे येथील मोक्का न्यायालयात सादर केल्यामुळे मंत्री गिरीश महाजनांचे ‘ते’ प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Jalgaon News: Girish Mahajan’s case is again in discussion due to the response of the former police superintendent!
पुण्याच्या मोक्का न्यायालयात अनिल देशमुखांविरुद्धचा सीबीआयचा अहवाल समोर आला आहे. गिरीश महाजनांच्या एका प्रकरणात सीबीआयने सदरचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनीही तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याला गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करण्यासाठी धमकी दिल्याचे अहवालात म्हटले आहे.

जळगाव जिल्हा मराठा सहकारी समाज विद्याप्रसारक संस्थेचा ताबा कुणाकडे असावा, यावरून नीलेश भोईटे आणि ॲड. विजय पाटील यांच्या गटात वाद सुरू होते. याच प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटातील काही सदस्यांच्या विरोधात रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस ठाण्यात ॲड. विजय पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी घडलेल्या कथित गुन्ह्याची फिर्याद सन २०२१ मध्ये नोंदवली होती. मात्र, सदरची घटना पुण्यात घडलेली असल्यामुळे पुण्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तीन वर्षांपूर्वीची घटना सांगण्यात येत असल्यामुळे त्याची आधी चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका घेऊ तत्कालिन पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी गुन्हा दाखल करून घ्यायला नकार दिला होता. मात्र, तेव्हा गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी एकाच आठवड्यात दोन वेळा मुंढे यांना फोन करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या त्या दबावामुळेच आपल्याला गुन्हा दाखल करून घ्यावा लागला, असेही जळगावचे तत्कालिन पोलिस अधीक्षक मुंढे यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button