जळगावमध्ये महासंस्कृती महोत्सव, मुक्ताई सरसचे खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते उदघाटन

Jalgaon News : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगावकरांसाठी पाच दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्थानिक कलाकार आणि राज्यातील कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्याचा आनंद जळगावकरांनी आनंद घ्यावा. त्याबरोबरच ‘मुक्ताई सरस’ प्रदर्शनाला भेट देऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन द्या, असे आवाहन खासदार उन्मेश पाटील यांनी केले.

28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान पोलीस कवायत मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन खासदार श्री. पाटील यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. देशाच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी महिलांच्या विकासासाठी अनेक योजना सुरु केल्या. त्यात गावागावात प्रशिक्षण देऊन ड्रोन दीदी तयार करणे, महिलांच्या बचत गटांना उमेदच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी अर्थ सहाय्य, विकासासाठी अनेक योजना सुरु केल्याचे खासदार उन्मेश पाटील यांनी यावेळी सांगितले.

स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे, लुप्त होत चाललेल्या कला-संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने जळगाव जिल्ह्यात 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव होत आहे.अजून चार दिवस आहेत, त्या महोत्सवाचा जिल्हावासीयांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. स्थानिक कलाकारांनी यावेळी वेगवेगळ्या कला सादर केल्या. त्यानंतर सुप्रसिद्ध ‘ महाराष्ट्राची हास्य यात्रा ‘ हा कार्यक्रम सुरु झाला.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button