Jalgaon News : पिंप्राळ्याचा रथ अनियंत्रित होऊन घराला धडकला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Jalgaon News : जळगाव शहरातील पिंप्राळ्यात दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी हजारो भाविक मोठ्या जल्लोषात विठ्ठलाचा रथ ओढतात. यंदाही रथोत्सवाची परंपरा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, अलिकडेच तयार करण्यात आलेल्या सिमेंटच्या गुळगुळीत रस्त्यावरून धावताना रथ अचानक अनियंत्रित झाला आणि शेजारच्या घरावर जाऊन धडकला. सुदैवाने त्यात कोणत्याही भाविकाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नाही. रथाची फळी मात्र तुटली.

Jalgaon News : Pimprala’s chariot went out of control and hit a house; Fortunately, a major disaster was averted
रथ अचानक अनियंत्रित होऊन गटारालगतच्या घराला जाऊन धडकल्यानंतर भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली. तासाभराच्या प्रयत्नानंतर अखेर जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढल्यानंतर विठ्ठलाचा रथ पुढच्या प्रवासाला निघाला. पुढे असलेला उताराचा रस्ता लक्षात घेता नंतर रथाच्या मागे जेसीबी मशिन ठेवून त्याचा दोर रथाला बांधण्यात आला. याशिवाय रथ ओढण्यासाठी मदत करणाऱ्या भाविकांच्या हातातील दोराची लांबी कमी करण्यात आली.

रथ मधुकर सोनवणे यांच्या घराला जाऊन धडकल्यानंतर त्यावर बसलेल्या सर्व भाविकांनी प्रसंगावधान राखून खाली उड्या मारल्या. पैकी गौरव वाणी व योगेश वाणी यांना थोडाफार मुका मार लागला. बाकी कोणालाच दुखापत झाली नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यंदा पिंप्राळ्याच्या रथोत्सवाचे १४९ वे वर्ष होते. एकादशीच्या दिवशी दुपारी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व महापालिकेच्या आयुक्तांनी त्याची पूजा केली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button