जळगावमध्ये भाजपा युवा मोर्चातर्फे राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन..!

जळगाव टुडे । लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाला हिंसक संबोधून हिंदू समाजाचा घोर अपमान केला आहे. याबद्दल भाजपा युवा मोर्चा जळगाव महानगर शाखेतर्फे काँग्रेस भवनाच्या समोरच आज मंगळवारी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार आंदोलन करण्यात आले. प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने देखील केली. ( Jalgaon News )

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मनोरुग्ण असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत भाजपा युवा मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. जळगाव महानगरचे महामंत्री डॉ.राधेश्याम चौधरी, सरचिटणीस अरविंद देशमुख, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष जितेंद्र मराठे, महामंत्री तसेच सचिव व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधितांनी जोरदार घोषणाबाजी करत यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्यालय दणाणून सोडले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button