पाडळसरे येथील तापी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यासाठी लागणाऱ्या वन जमिनीची मान्यता अंतिम टप्यात

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील पाडळसरे (ता. अमळनेर) निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात 3.12 हेक्टर एवढी वन जमीन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात बुडीताखाली जाते. त्या जमिनीला तत्वतः मान्यता मिळाली असून अंतिम मान्यतेसाठीचा प्रस्ताव देखील अंतिम टप्यात आहे. त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि खासदार उन्मेश पाटील यांनी विशेष पाठपुरावा केला.

पाडळसरे (ता. अमळनेर) येथील निम्न तापी प्रकल्पासाठी लागणारी वन जमीन कमळगाव, वडगाव, पिंप्री (ता.चोपडा) व जळोद (ता.अमळनेर) या गावात मिळून एकत्रित 3.12 हेक्टर एवढी आहे. या जमिनीसाठी केंद्रीय वन व पर्यावरण विभागाने तत्वतः मान्यता सन 2012 मध्ये दिली होती व त्यानंतर जमिनीच्या संपादनासाठी जामनेर तालुक्यातील भागदरा या गावातील शासकीय जमीन वन विभागास हस्तांतरण करून रु. 5.50 कोटी एनपीव्ही व इतर खर्च मिळून जमा केले आहेत. सन 2022 मध्ये वन विभागाने तत्वतः मान्यतेस दीर्घ कालावधी झाल्यामुळे नव्याने तत्वतः मान्यता घेण्याबाबत कळविले होते. त्यानुसार या प्रकल्पासाठी लागणाऱ्या वन जमिनीसाठी प्रस्ताव वन विभागाकडे ऑनलाईन सादर केलेला आहे. या प्रस्तावाप्रमाणे स्थळ पाहणी पूर्ण झालेली असून जळगाव उपवन संरक्षक आणि यावल या कार्यालयाने मूल्यांकन इत्यादी सह प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयास मुख्यवन संरक्षक ,धुळे यांच्याकडे सादर केले जाणार आहे. निम्न तापी प्रकल्पाच्या वन विभागाच्या अटी व शर्ती परवान्यासह 3.12 हेक्टर वन जमीन प्रस्तावास अंतिम मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button