Jalgaon Gramin : धरणगाव तालुक्यातील साळव्याच्या आदिवासींनी फुंकली ‘तुतारी’; शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश…!
Jalgaon Gramin : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व समावेश कार्य पद्धतीमुळे प्रभावित झालेल्या साळवा (ता.धरणगाव) येथील असंख्य आदिवासी बांधवांनी आज शुक्रवारी (ता.२०) या पक्षात जाहीर प्रवेश करत तुंतारी फुंकली. जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या सर्व आदिवासींचे पक्षाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत केले.
Jalgaon Gramin : The tribals of Salwa in Dharangaon taluka blew ‘Tutari’; Sharad Chandra Pawar’s official entry into NCP…!
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. तुम्ही केव्हा पण आवाज द्या, असे प्रतिपादन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे अशोक सोनवणे तसेच मजूर फेडरेशनचे माजी सभापती प्रकाश पाटील, लीलाधर तायडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘यांनी’ केला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये साळवा येथील हिरालाल बारेला, रवी बारेला, रघुनाथ पावरा, बापू साळुखे, यशवंत अहिरे, दीपक पावरा, बापू कोळी, सुनील बारेला, जामसिंग पावरा, विकास पावरा, कृष्णा बारेला, महेश बारेला, भटा बारेला, पिंटू पावरा आदींचा समावेश होता.