Jalgaon Gramin : गुलाबराव देवकरांच्या प्रचार रॅलीला म्हसावद, शिरसोली, वावडदा भागात उत्स्फूर्त प्रतिसाद…!
-विटनेरच्या ग्रामस्थांनी काढली घोड्यावरून मिरवणूक
Jalgaon Gramin : जळगाव ग्रामीणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचार रॅलीला म्हसावद, शिरसोली, वावडदा, विटनेर भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले असून, विटनेर येथे तर त्यांची थेट घोड्यावरून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
Jalgaon Gramin : Spontaneous response to Gulabrao Deokar’s campaign rally in Mhasavad, Shirsoli, Vavadda areas…!
पद्मालय तीर्थक्षेत्रावर प्रचार नारळ वाढविल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी जळगाव तालुक्यातील प्रचाराला सुरूवात केली. पहिल्या टप्प्यात म्हसावद, बोरनार, लमांजन, वाकडी, कुऱ्हाडदे, पाथरी, वडली, डोमगाव, जवखेडा, विटनेर, जळके, बिलवाडी आदी गावांना भेटी दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शिरसोली प्र.न. आणि शिरसोली प्र.बो., रामदेववाडी, सुभाषवाडी, वावडदा, मोहाडी, दापोरा आदी गावांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी काढण्यात प्रचार रॅलीचे सर्व ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत झाले. महिलांनी त्यांचे औक्षण केले.
यावेळी उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, धरणगाचे उबाठा शहर प्रमुख भागवत चौधरी, युवा जिल्हा संघटक विनोद रोकडे, भीमराव पांडव, अरूण कोळी, जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, युवक जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.अरूण पाटील, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, दापोरा येथील नानाभाऊ सोनवणे, शिरसोलीच्या सरपंच उषाबाई पवार, वावडद्याचे सरपंच राजेश वाडेकर, विटनेरचे उपसरपंच शांताराम पाटील, विकास सोसायटीचे संचालक गणेश परदेशी, प्रकाश भगत आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुलाबराव देवकरांकडे मतदारांनी मांडली व्यथा
महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी म्हसावद, वावडदा, शिरसोली, रामदेववाडी, मोहाडी भागात प्रचार रॅली काढल्यानंतर तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. तेव्हा पिण्याच्या पाण्यासह अन्य बऱ्याच मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या महिला व पुरूष मतदारांनी त्यांच्याकडे आपली व्यथा मांडली. तसेच सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी तिकडे कधीच फिरकत नसल्याने आमच्या भागाचा विकास थांबल्याचे अनेकांनी सांगितले.