Jalgaon Gramin : शिवसेना शिंदे गटाला खिंडार; उपजिल्हा प्रमुख नानाभाऊ सोनवणे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Jalgaon Gramin : जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे उर्फ नानाभाऊ, त्यांचे चिरंजीव युवा सेनेचे जळगाव तालुका संघटक शुभम सोनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांचे पक्षाच्या वतीने स्वागत केले.

Jalgaon Gramin: Shiv Sena defeats Shinde group; Upzilha chief Nanabhau Sonwane along with numerous activists joined the Nationalist Sharad Chandra Pawar party

विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात वाऱ्याची दिशा बदलल्याने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तशात आज शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे जळगाव येथील उपजिल्हा प्रमुख तसेच दापोरा गावाचे माजी सरपंच नानाभाऊ सोनवणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला. त्यांच्यासोबत युवा सेनेचे जळगाव तालुका संघटक शुभम सोनवणे, दापोरा विकास सोसायटीचे चेअरमन प्रकाश आबा काळे आणि तेजस सोनवणे, नाना गवंदे, बाळुभाऊ सोनवणे, भावलाल सपकाळे, उत्तम सोनवणे, विठ्ठल साठे आदींनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची साथ देण्याचा निर्धार केला.

याप्रसंगी जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नीलेश पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.अरूण पाटील, मजूर फेडरेशनचे माजी सभापती लीलाधर तायडे, पाथरीचे माजी सरपंच संतोष नेटके तसेच वाल्मीक पाटील, तुकाराम तांदळे उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button