Jalgaon Gramin : असोदा येथील असंख्य आदिवासी तरूणांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश…!
Jalgaon Gramin : सर्वांना नेहमीच सोबत घेऊन चालणारे जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असोदा येथील असंख्य आदिवासी तरूणांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केला. स्वतः गुलाबराव देवकर यांनी सर्व तरूणांचे पक्षाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत केले.
Jalgaon Gramin: Sharad Chandra Pawar’s admission of tribal youth from Asoda to NCP party…!
तळागाळातील मागास जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच करत आहे. जळगाव ग्रामीणमधील आदिवासी बांधवांनाही सोबत घेऊन चालण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे प्रतिपादन माजी मंत्री श्री.देवकर यांनी केले. याप्रसंगी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी तसेच बरकत अली, मजूर फेडरेशनचे माजी सभापती लीलाधर तायडे, नीलेश पाटील तसेच असोदा येथील शिवाजी भैया पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य हेमंत पाटील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष सचिन माळी, धवल पाटील, योगेश भोळे, खेमचंद महाजन, महारू कोळी, युगंधर पाटील, दीपक साळवे, सचिन कोळी, सागर पाटील आदी उपस्थित होते.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ‘यांनी’ केला जाहीर प्रवेश
अजय बुधो भिल, संतोष सुरेश सोनवणे, गणेश राजू भिल, राहुल बुधो भिल, अजय भाईदास भिल, दिलीप रामसिंग भिल्ल, राहुल सुकदेव गायकवाड, शंकर दिनकर भिल, गणेश देविदास भिल, श्रावण सुभाष भिल, सागर संजय भिल, विशाल पिंटू भिल, समाधान भास्कर भिल, गोकूळ सुरेश भिल, भैया सुभाष भिल, कैलास भीकन भिल, दिलीप रामसिंग भिल, संतोष बाळू भिल, सचिन सुकदेव गायकवाड, दीपक गिरधर भिल, मंगेश दीपक भिल, भरत सुरेश भिल, तानाजी गोवर्धन भिल, जयेश पिंटू भिल, आदित्य संजय भिल, जयेश दशरथ भिल, बुधो भिल, योगेश रवींद्र भिल, सुनील वसंत भिल, किशोर भिल, दिनकर भिल, शरद भास्कर भिल, विनायक वसंत भिल, कैलास पंडीत सोनवणे, छोटू मधुकर भिल, रवींद्र हरी भिल, नरेश भिल, अनिल पुंडलिक गायकवाड.