Jalgaon Gramin : म्हसावदच्या सरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर; १५ ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान…!
Jalgaon Gramin : ग्रामपंचायतीच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणारे म्हसावद (ता.जळगाव) येथील सरपंच गोविंदा प्रकाश पवार यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. सदर ठरावाच्या बाजुने १७ पैकी १५ सदस्यांनी मतदान केले असून, एक सदस्य गैरहजर होता. जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.
Jalgaon Gramin : No-confidence motion passed on Sarpanchs of Mhasavad; 15 members voted in favor of the resolution…!
गेल्या साडेतीन वर्षांपासून सरपंच असलेले गोविंदा पवार हे सदस्यांमधून निवडून आलेले असताना, ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर लोकनियुक्त असल्याचा उल्लेख करतात. ग्रामविकासाकडे दुर्लक्ष करून सदस्यांना विश्वासात घेत नाही. सदस्यांसमोर तयार झालेल्या विकासकामांच्या कृती आराखड्यातही त्यांच्याकडून परस्पर बदल करतात, असे बरेच आरोप सरपंच गोविंदा पवार यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करताना बहुतांश ग्रामपंचायत सदस्यांनी केले होते. सदर अविश्वास ठरावाची पडताळणी करण्यासाठी तहसीलदार शीतल राजपूत यांच्या उपस्थितीत म्हसावदच्या ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्य संजय सुकलाल मोरे, शीतल दीपक चिंचोरे, अनिता प्रमोद पाटील, मीना महेंद्र चिंचोरे, मीनाबाई श्रीराम धनगर, विठाबाई प्रकाश पाटील, रेखाबाई मनोज पाटील, तरन्नुम बी अहमद शहा, मंगलाताई सुधाकर पाटील, विवेक किशोर चव्हाण, बापू कौतिक धनगर, इंदल रमेश भोई, विजय नंदलाल कटारिया, वंदनाबाई अनिल कोळी, ज्योतीबाई सुधाकर इंदलकर या १५ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान केले. तर स्वतः सरपंच गोविंदा प्रकाश पवार यांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केले.