Jalgaon Gramin : धनशक्ती विरूद्ध जनशक्ती; गुलाबराव देवकरांसाठी धरणगाव तालुक्यातील बिलखेडा ग्रामस्थांनी जमविले ५० हजार…!

Jalgaon Gramin : विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना गावागावातील मतदारांकडून तन, मन आणि धनाने पाठिंबा मिळू लागला आहे. धनशक्ती विरूद्ध जनशक्तीच्या या लढ्यात धरणगाव तालुक्यातील बिलखेडा गावाने सुमारे ५० हजार रूपये लोकवर्गणी जमा करून त्याची सुरूवातही केली आहे. ज्याची सगळीकडे चर्चा देखील होत आहे.

Jalgaon Gramin : Money Power vs People Power; Bilkheda villagers collected 50 thousand for Gulabrao Deokar…!

माजी मंत्री गुलाबराव देवकर हे प्रस्थापितांना आव्हान देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यापासून जळगाव तसेच धरणगाव तालुक्यातील सर्वच गाव खेड्यातून त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गावात ढोल-ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. इतकेच नव्हे तर त्यांची चक्क घोड्यावरून मिरवणूक काढण्यात येत आहे. अनेक ठिकाणचे तरूण राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी रांगा लावत आहे. देवकरांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेता ग्रामीण मतदारसंघात आतापासूनच तुतारीचा आवाज घुमू लागला आहे. तरूणांसह महिला व पुरूष मतदारांनी त्यांची ही यंदाची विधानसभा निवडणूक स्वतःच्या ताब्यात घेतल्याचा प्रत्यय ठिकठिकाणी येत आहे. धरणगाव तालुक्यातील बिलखेडा सारख्या छोट्याशा खेड्याने तर मनाचा मोठेपणा दाखवून गुलाबराव देवकरांना आर्थिक मदत म्हणून सुमारे ५० हजार रूपये लोकवर्गणी जमा करून दिली आहे. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे जमा केलेली मदत स्वीकारताना स्वतः गुलाबराव देवकर आणि त्यांच्या सोबतच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहिले नाही. धनशक्ती विरूद्ध जनशक्तीच्या या लढाईत बिलखेडा ग्रामस्थांकडून मिळालेल्या ‘फुल ना फुलाची पाकळी’ आर्थिक मदतीने माझा विजयाचा आत्मविश्वास आणखी वृद्धींगत झाला आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री देवकर यांनी दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button