Jalgaon Gramin : इनकमिंग सुरूच; कुसुंबा येथील माजी सरपंचांसह ग्रा.पं.सदस्यांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…!
Jalgaon Gramin : जळगाव ग्रामीण मतदारसंघात मागील काही दिवसांपासून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुसुंबा (ता.जळगाव) येथील माजी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी देखील आता राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सर्वांचे हार्दिक स्वागत पक्षाच्या वतीने स्वतः गुलाबराव देवकर यांनी केले.
Jalgaon Gramin : Incoming continues; Gram panchayat members of Kusumba Sharad Chandra Pawar join NCP party…!
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे विकासाचे एक स्पष्ट व्हिजन आहे, त्यामुळेच गावागावातील ग्रामपंचायती तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे अनेक पदाधिकारी व सदस्य या पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रेरीत झाले आहेत. पक्षातील इनकमिंग वाढल्यानंतर अर्थातच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद द्विगुणीत झाली आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना राष्ट्रवादीची पर्यायाने माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांची लोकप्रियता वाढल्यानंतर प्रतिस्पर्धी पक्षाचे धाबे चांगलेच दणाणाले आहे. तशात कुसुंबा येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्यांच्या पक्ष प्रवेशानंतर आणखी मोठा हादरा विरोधकांना बसला आहे. कुसुंबा येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण हे देखील उपस्थित होते.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ‘यांनी’ केला जाहीर प्रवेश
विजय रामचंद्र साबळे (माजी सरपंच), राजाराम देवराम पाटील (माजी सरपंच), ग्रामपंचायत सदस्य- अशोक रामदास पाटील, रामदास मारोती कोळी, संदीप मंगल कोळी, पृथ्वीराज नामदेव पाटील तसेच अजीत सुपडू तडवी, मधुकर आत्माराम राणे, संजय विक्रम पाटील, बाबुलाल हरी पाटील, नंदू भाऊराव पाटील, विनोद रामसिंग भोळे, देविदास कौतीक पाटील, किशोर अजबसिंग पाटील, दिनकर फकीरा पाटील, संजय मोतीराम पाटील, पारूमल मोहन राजपाल, संजय कौतीक पाटील, प्रकाश पितांबर सोनवणे, लक्ष्मण पंडीत पाटील, शिवाजी धनसिंग पाटील, देविदास अवधूत राणे, रामदास प्रताप पाटील.