Jalgaon Gramin : गुलाबराव देवकरांना गावागावात वयोवृद्धांचे भरभरून आशिर्वाद, प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

Jalgaon Gramin : जळगाव ग्रामीणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी शिरसोली-चिंचोली गटातील धानवड, धानवड तांडा, चिंचोली, कंडारी, कुसुंबा आदी गावात काढलेल्या प्रचार रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावागावात त्यांना वयोवृद्धांनी भरभरून आशिर्वाद दिले, तर महिलांनी औक्षण केले.

Jalgaon Gramin : Gulabrao Deokar received abundant blessings from the elderly in every village, spontaneous response to the campaign rally…!

यावेळी उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, उबाठा शहर प्रमुख भागवत चौधरी, युवा जिल्हा संघटक विनोद रोकडे, भीमराव पांडव, अरूण कोळी, जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, उपाध्यक्ष नवल पाटील, युवक जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, विद्यमान उपसभापती प्रा.पांडुरंग पाटील, संचालक डॉ.अरूण पाटील, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, दापोरा येथील नानाभाऊ सोनवणे, धानवडचे दिलीप चव्हाण, चिंचोलीचे शरद घुगे, सतीश घुगे, रघुनाथ पालवे, शुभम लाड तसेच अनिल खडसे, वसंत पाटील, राधेश्याम पाटील, राजाराम नाना, विलास कोळी, लक्ष्मण बापू, शिवाजी पाटील, राहुल सोनवणे, सुनील सुर्वे, मनीष सुर्वे, सुरेश धनगर, धनराज पाटील आदींसह अनेक ठिकाणचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायट्यांचे चेअरमन, संचालक तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीत एकजूट, सर्वत्र उत्साहाचे वातावरण

गुलाबराव देवकर यांच्या प्रचारात अगदी पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीचे घटक पक्ष उद्धव सेना व काँग्रेसच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. सर्वजण एकदिलाने प्रचारात उतरल्याने जळगाव ग्रामीणमध्ये त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. तळागाळातील कार्यकर्ते माजी मंत्री श्री.देवकर यांनी मंत्रीपदाच्या काळात केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. जळगाव ग्रामीणच्या विकासासाठी त्यांना पुन्हा संधी देण्याचे आवाहनही प्रचार रॅलीच्या माध्यमातून केले जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button