Jalgaon Gramin : विटनेरची ग्रामपंचायत शिंदे सेनेत गेलीच नाही, गुलाबराव देवकरांसोबत प्रचारात सहभागी…!
Jalgaon Gramin : जळगाव तालुक्यातील विटनेरची अख्खी ग्रामपंचायत शिंदे सेनेत गेल्याचे आणि त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये तीन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते. मात्र, विटनेरच्या उपसरपंचांसह सर्व ग्रा.पं.सदस्य तसेच विकास सोसायटीच्या संचालकांनी आपण कुठेच गेलो नसल्याचे सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला आहे.
Jalgaon Gramin : Gram Panchayat of Vitner has not joined Shinde Sena, participated in campaign with Gulabrao Deokar…!
महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी बुधवारी पद्मालय देवस्थानावर निवडणूक प्रचाराचा नारळ वाढवून म्हसावद-बोरनार जिल्हा परिषद गटातील प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी विटनेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच शांताराम पाटील, सदस्य सागर दिवाने, जुलाल निकम, रघुनाथ जाधव, रमेश परदेशी, लक्ष्मण पाटील, भूषण पाटील, कैलास मालचे, गोकूळ राठोड तसेच विकास सोसायटीचे संचालक गणेश परदेशी, प्रकाश भगत यांनीही हजेरी लावली. आम्हीच कोणत्यात पक्षात प्रवेश केलेला नसून सदैव माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासोबतच आहोत, असे सर्वांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हा प्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, दीपक वाघमारे, जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, युवक जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लकी टेलर, विद्यमान उपसभापती प्रा.पांडुरंग पाटील, संचालक डॉ.अरूण पाटील, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, दापोरा येथील नानाभाऊ सोनवणे, शिरसोली येथील गोलू पवार, म्हसावद येथील कैलास पाटील, विवेक चव्हाण, संजय पाटील आदी उपस्थित होते.