Jalgaon Gramin : माजी मंत्री गुलाबराव देवकर सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार…!
धरणगाव शहरात ऐतिहासिक रॅली निघणार
Jalgaon Gramin : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर हे सोमवारी (ता.२८) सकाळी धरणगाव येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित धरणगाव शहरातून ऐतिहासिक रॅली निघणार आहे. जळगाव तसेच धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
Jalgaon Gramin: Former minister Gulabrao Deokar will file his candidature on Monday
जळगाव ग्रामीण मतदारसंघाची गेल्या १० वर्षात झालेली पिछेहाट लक्षात घेता परिवर्तनाच्या लाटेत सहभागी होऊन आपल्या हक्काचे सरकार आणण्यासाठी गावागावातील तरूण आता पेटून उठले आहेत. महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये तरूणांची संख्या लक्षणीय असून, आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी यंदा कोणत्याही परिस्थितीत जळगाव ग्रामीणमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार सर्व तरूणांनी केल्याचे सांगितले जात आहे. महिला भगिनी देखील कोणत्याही आमिषांना बळी न पडता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्याचे दिसून येत आहे.