Jalgaon Gramin : माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केला निवडणूक जिंकण्याचा निर्धार…!

-जळगाव तालुका कार्यकर्ता बैठकीत युवकांशी संवाद

Jalgaon Gramin : महाविकास आघाडीकडून जळगाव ग्रामीणसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या विचारांशी जुळलेल्या युवकांशी संवाद साधून निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व तरूण कार्यकर्त्यांसाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी माजी मंत्री श्री.देवकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण सर्वांनी पुढील काही दिवस अविश्रांत मेहनत घ्यायची आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे यंदा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास सुद्धा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी कार्यकर्ता बैठकीत व्यक्त केला.

‘यांची’ होती बैठकीला उपस्थिती

शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख पंकज महाजन, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, उपाध्यक्ष नवल पाटील, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख उमेश पाटील, तालुका उपप्रमुख संजय पवार, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा.पांडुरंग पाटील, संचालक योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, डॉ.अरूण पाटील, दापोऱ्याचे नानाभाऊ सोनवणे, वावडद्याचे सरपंच राजेश वाडेकर, सामाजिक न्यायचे अशोक सोनवणे, नशिराबादचे बरकत अली, धानवडचे दिलीप चव्हाण, असोद्याचे ग्रा.पं. सदस्य हेमंत पाटील, धवल पाटील, शिरसोलीचे ॲड.विजय बारी, गोलू पवार, अर्जून पवार, सुभाष बारी, डिगंबर बारी, दापोऱ्याचे तुकाराम तांदळे, समाधान निकुंभ, शुभम सोनवणे.

Jalgaon Gramin : Former minister Gulabrao Deokar is determined to win the election...!

WhatsApp Group

Related Articles

Back to top button