Jalgaon Gramin : धरणगाव तालुका प्रति बारामती करणार, बेरोजगार तरूणांना रोजगार देणार…!

-माजी मंत्री गुलाबराव देवकरांचे आश्वासन

Jalgaon Gramin : गेल्या काही वर्षात धरणगाव तालुक्याचा विकास थांबला आहे. बेरोजगार तरूणांच्या हाताला काम राहिलेले नाही. विधानसभेवर निवडून आल्यानंतर धरणगाव तालुक्याला प्रति बारामती बनविण्यासह येथील पाणी टंचाई आणि रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल, असे आश्वासन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिले.

Jalgaon Gramin : Dharangaon taluka making Baramati and will provide employment to unemployed youth- gulabraob deokar

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जळगाव ग्रामीणची उमेदवारी मिळाल्यानंतर सोमवारी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी धरणगाव येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, जळगाव महानगराध्यक्ष एजाज मलीक, महिला अध्यक्षा मंगला पाटील, कार्याध्यक्ष शालीग्राम मालकर, राजेंद्र चौधरी, श्रीराम पाटील, सामाजिक न्यायचे प्रदेश सरचिटणीस रामचंद्र जाधव, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, दीपक वाघमारे, शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना ठाकरे गटाचे धरणगाव तालुकाध्यक्ष जयदीप पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष उमेश पाटील, काँग्रेसचे धरणगाव तालुकाध्यक्ष व्ही.डी.पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश चौधरी, लकी टेलर आदी उपस्थित होते.

दरम्यान, सभेच्या ठिकाणी गुलाबराव वाघ यांच्यासह प्रमोद पाटील, एजाज मलिक, शालिग्राम मालकर, रामचंद्र जाधव, प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, प्रा.भाऊसाहेब सोनवणे, गुलाबराव वाघ, नीलेश चौधरी, रमेश पाटील, प्रतिभा शिंदे, डॉ.व्ही.डी.पाटील, अर्जुन पाटील, संतोष सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी केले.

गुलाबराव देवकरांचे उमेदवारी अर्ज भरताना अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धरणगाव शहरात अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन केले. बालाजी मंदिरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या ऐतिहासिक रॅलीने धरणगाव शहरातील आजपर्यंतच्या गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत काढले. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजराने अख्खे धरणगाव शहर दणाणून गेले. महाविकास आघाडीचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button