Jalgaon Gramin : भोकर-पळसोद रस्त्याचे काम निकृष्ठ; उबाठाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रस्त्यातच घातले महायुतीचे श्राद्ध…!

Jalgaon Gramin : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोकर ते पळसोद, जामोद,आमोदा बुद्रुक, गाढोदा या ग्रामीण रस्त्याचे काम चार महिन्यांपूर्वी झाले होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या या रस्त्याची सध्या प्रचंड दुर्दशा झाली असून या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी केली. प्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन उबाठाने रस्त्यातच महायुतीच्या सरकारचे श्राद्ध देखील घातले.

Jalgaon Gramin : Bhokar-Palsod road work poor; Under the leadership of Ubatha, the farmers performed the Shradh of Mahayuti on the road…!

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जळगांव ग्रामीण मतदारसंघात रस्त्याचे श्राद्ध घालून आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. चार महिन्यांपूर्वी तयार झालेला भोकर ते पळसोद, जामोद, आमोदा बु,गाढोदा रस्ता आता कात टाकायला लागला. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी जळगाव ग्रामीणचे शिवसेना उबाठा पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांना समस्या सांगितल्यावर त्यांनी आंदोलन पुकारून शासनासह राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले. भोकर-पळसोद एकूण रस्त्याची लांबी ११.९३ किलोमीटर असून त्याचा एकूण खर्च ८१८.३२ लाख रुपये इतका आहे. सदरील रस्ता भोकर-पळसोद-जामोद-आमोदा बु.-गाढोदा असा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आला आहे. या रस्त्यामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झालेला आहे, असा संशय आम्हाला आहे. म्हणून या रस्त्याची चौकशी करून कार्यकारी अभियंता प्रधान मंत्री ग्रामसडक योजना तसेच संबधीत अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच पालकमंत्री यांनी जबाबदारी स्वीकारावी व तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी उबाठाचे उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी केली. यावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना पदाधिकारी भगवान धनगर, भरत पाटील, प्रभाकर कोळी, एकनाथ सैंदाने, समाधान पाटील तसेच शेतकरी बांधव योगराज पाटील, हेमंत पाटील, मच्छीन्द्र पाटील, बाबुराव पाटील, डॉ.ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील, शिरीष पाटील, विकास पाटील, शिवाजी पाटील, सुनील पाटील, मुकेश बारेला, प्रवीण पाटील, हिरालाल पाटील उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button