Jalgaon Gramin : ममुराबाद विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल वसंत पाटील यांची बिनविरोध निवड

व्हाईस चेअरमनपदी नारायण धनगर

Jalgaon Gramin : जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल वसंत पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी नारायण पुना धनगर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. यावेळी मनोज भारंबे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Jalgaon Gramin: Anil Vasant Patil unopposed as Chairman of Mamurabad Development Society

मावळते चेअरमन बाळकृष्ण सखाराम पाटील आणि व्हाईस चेअरमन भानुदास सोनवणे यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. दरम्यान, चेअरमनपदासाठी अनिल पाटील यांचा आणि व्हाईस चेअरमनपदासाठी नारायण धनगर यांचेच अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी मनोज भारंबे यांना संस्थेचे सचिव राजेंद्र क्षीरसागर यांनी सहकार्य केले.

‘यांची’ होती उपस्थिती

चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीच्या वेळी विकास सोसायटीचे संचालक अशोकआबा गावंडे, बाळकृष्ण पाटील, हेमंत चौधरी, शरद पाटील, भास्कर ढाके, शालीक पाटील, आधार शिंदे, गणेश पाटील, भानुदास सोनवणे, साधना चौधरी, अश्विनी सोनवणे, सुभाष पाटील, पीक संरक्षण सहकारी संस्थेचे चेअरमन भरत शिंदे, संचालक डॉ.उल्हास कोलते, अमर पाटील, युवराज देवरे, सचिव किशोर चौधरी, नारायण शिंदे, राजेंद्र शिंदे, पद्माकर पाटील, नंदू पाटील, निखील पाटील, कपिल पाटील, युवराज पाटील, छन्नू कोळी, बापू सोनवणे आदी उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button