Jalgaon Gramin : भूमिपूजन भुईकाट्याचे; जळगाव ग्रामीणमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकरांचे राजकीय वजन वाढल्याचा प्रत्यय !

Jalgaon Gramin : विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असताना, जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिंदेसेना व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जळगाव ग्रामीणवरील त्यांचा प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. किनोद (ता.जळगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ८० टन इलेक्ट्रॉनिक भुईकाट्याचे भूमिपूजन स्वातंत्र्य दिनी झाले, त्याप्रसंगी देखील जळगाव ग्रामीणमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकरांचे राजकीय वजन वाढल्याचा प्रत्यय आला.

algaon Gramin : Bhoomipujan of Bhuikata; The political weight of former minister Gulabrao Deokar is confirmed in Jalgaon Rural!

विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वात आधी रणशिंग फुंकले आहे. पारंपरीक प्रतिस्पर्धी व शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य करण्याची एकही संधी माजी मंत्री गुलाबराव देवकर सोडत नसल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर सुद्धा दोन्ही गटात जोरदार युद्ध छेडले गेले आहे. दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना जळगाव व धरणगाव तालुक्यातील रस्त्यांसह पाणी पुरवठा योजनांच्या निकृष्ठ कामांवर बोट ठेवून कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही केला आहे. देवकरांच्या या भूमिकेचे जळगाव ग्रामीणच्या जनतेकडूनही उत्स्फूर्त स्वागत होत आहे. गाव तसेच तालुका पातळीवरील अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालू लागले आहेत. तरूण वर्गही त्यांच्यासाठी वाट्टेल ते करण्याच्या तयारीत दिसत आहे. जळगाव ग्रामीणमधील हे वारं असं अचानक फिरल्यानंतर अर्थातच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बोलले जात आहे.

भुईकाट्याच्या भूमिपूजन कार्यक्रमातही गुलाबराव देवकरांचा बोलबाला

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य तसेच सहकारी संस्थांवर माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या समर्थकांची सत्ता आहे. जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवरही माजी मंत्री देवकर यांना मानणाऱ्यांची सध्या सत्ता आहे. स्वातंत्र्य दिनी गुलाबराव देवकर यांच्याच हस्ते किनोद (ता.जळगाव) येथे ८० टन इलेक्ट्रॉनिक भुईकाट्याचे भूमिपूजन करण्यात यावे, असा आग्रह संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांचा होता. त्याठिकाणी देवकरांनी विधीवत पूजन करून भुईकाट्याचे भूमिपूजन देखील केले. यावेळी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह परिसरातील सर्व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीकडून चांगले प्रकल्प हाती घेतले जात असल्याचे पाहुन भोकर, भादली, आमोदा, गाढोदा, पळसोद, फुपनी, करंज, सावखेडा परिसरातील केळी उत्पादकांनी विशेष समाधान यावेळी व्यक्त केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button