जळगाव जिल्ह्यात 60 ग्रामपंचायतींना मिळणार नवीन इमारत, 13.25 कोटींचा निधी
Jalgaon District : जळगाव जिल्ह्यात स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसलेल्या सुमारे 60 ग्रामपंचायतींना लवकरच नवीन इमारत मिळणार आहे. शासनाने त्यांच्या बांधकामासाठी सुमारे 13 कोटी 25 लाख रूपये निधी देखील मंजूर केला आहे. त्यातून प्रत्येक ग्रामपंचायतीला साधारणपणे 20 ते 25 लाखांचा निधी प्राप्त होणार आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या माध्यमातून ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही, अशा जळगाव जिल्ह्यातील 60 ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली आहे. प्रस्तूत इमारत बांधकामामध्ये ग्रीन बिल्डिंग संकल्पना अंमलात आणून नैसर्गिक प्रकाश योजना व वायूविजन तसेच पाण्याच्या व उर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनर्भरण आणि जास्तीतजास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामुग्रीचा वापर करणे आवश्यक राहणार आहे. तसेच ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम एक वर्षाच्या आत पूर्ण करावे लागणार आहे.
नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती :
➡️ जामनेर तालुका- देऊळगाव, नेरी बुद्रुक, खडकी, देवपिंप्री, तोरनाळा, तळेगाव, बेटावद बुद्रुक, टाकळी बुद्रुक, गोंडखेड, गारखेडा खुर्द, जंगीपुरा, करमाड, सुनसगाव खुर्द, हिवरखेडा दिगर, नवी दाभाडी, रामपूर, काळखेडा, जळांद्री बुद्रुक, पिंपळगाव गोलाईत, सवतखेडा, पठाड, मादणी.
➡️ यावल तालुका- वढोदा प्र.सा.
➡️ भडगाव तालुका- गिरड.
➡️ चाळीसगाव तालुका- सेवानगर, पिंपळगाव, पळासरे, जामडी, रहिपुरी, रांजणगाव, गणेशपूर, करगाव, हातगाव, तळोंदे प्रदे.
➡️ चोपडा तालुका- गणपूर, सत्रासेन, मामलदे, कठोरा.
➡️ धरणगाव तालुका- धानोरा, पाळधी बुद्रुक, हेडगेवार नगर.
➡️ एरंडोल तालुका- जवखेडे सीम, खेडी खुर्द.
➡️ जळगाव तालुका- धानोरा बुद्रुक, आसोदा, कुसुंबे, खेडी, सावखेडा बुद्रुक.
➡️ रावेर तालुका- वाघोदा खुर्द, कोचूर खुर्द.
➡️ पारोळा तालुका- चिखलोद, रताळे, सार्वे बुद्रुक, रत्नापिंप्री, सावखेडा तुर्क, मोरफळ.
➡️ पाचोरा तालुका- कोल्हे, पिंपळगाव खुर्द, बदरखे, लोहारी.