Jalgaon Apmc : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सोमवारी (ता.२६) मिळाला ‘इतका’ भाव…!

Jalgaon Apmc : पुणे, नाशिक आणि मुंबई वगळता राज्यातील ठिकाठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची आवक मंदावली आहे. मागणीनुसार पुरवठा नसल्याच्या स्थितीत अर्थातच कांद्याला बऱ्यापैकी भाव सुद्धा मिळत आहे. अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणी कांद्याला कमाल ४००० ते ५००० रूपये प्रति क्विंटलचा भाव सुद्धा मिळाला आहे. जळगावमध्येही लाल कांदा ४१७५ रूपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

Jalgaon Apmc : In Jalgaon Agricultural Income Market Committee, onion got ‘so much’ price on Monday..!

महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी (ता.२६) जळगाव बाजार समितीत लाल कांद्याची २७७ क्विंटल आवक झाली आणि त्यास १००० ते ४१७५, सरासरी २६२५ रूपये क्विंटलचा भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगरात कांद्याची २१५१ क्विंटल आवक होऊन २००० ते ४०००, सरासरी ३००० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. पुण्यात कांद्याची ८२४९ क्विंटल आवक होऊन २५५० ते ३७५० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सांगलीत २०५५ क्विंटल आवक होऊन २००० ते ४२०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. साताऱ्यात कांद्याची ७० क्विंटल आवक होऊन ३००० ते ४५०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सोलापुरात कांद्याची ७४ क्विंटल आवक झाली आणि त्यास २५०० ते ५००० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. नाशिकमध्ये मात्र उन्हाळी कांद्याची सुमारे ४५ हजार ८५० क्विंटल आवक झाली आणि त्यास १७६८ ते ३९९० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. मुंबईतही कांद्याची १३ हजार ६२१ क्विंटल आवक झाली. त्यास ३३०० ते ३९००, सरासरी ३६०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button