जळगावमध्ये दादर ज्वारीला सरासरी 3000 रूपये प्रति क्विंटलचा भाव
Jalgaon APMC : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या काढणीला वेग दिल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आता ज्वारीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणी चांगली असल्याने विशेषतः दादर ज्वारीला सरासरी 3000 रूपये प्रति क्विंटलचा भाव देखील मिळाला आहे. हायब्रीड ज्वारीला सुद्धा सरासरी 2300 रूपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, शनिवारी (ता. 02 मार्च) जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दादर ज्वारीची सुमारे 11 हजार 975 क्विंटल आवक झाली. दादर ज्वारीला 2542 ते 3184, सरासरी 3017 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. हायब्रीड ज्वारीची 354 क्विंटल आवक होऊन 2099 ते 2495, सरासरी 2296 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
बाजरीची 50 क्विंटल आवक होऊन 2200 ते 2551 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. गव्हाची 1102 क्विंटल आवक होऊन 2254 ते 2450 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. मक्याची 450 क्विंटल आवक होऊन 1840 ते 2111 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. हायब्रीड हरभऱ्याची 113 क्विंटल आवक होऊन 5100 ते 5545 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. चाफा हरभऱ्याची 3678 क्विंटल आवक होऊन 5367 ते 5635 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. लाल हरभऱ्याची 8 क्विंटल आवक होऊन सरासरी 8050 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
लाल तुरीची 22 क्विंटल आवक होऊन 8300 ते 9000 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. लोकल ओव्याची 8 क्विंटल झाली, त्यास 10000 ते 14101 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सोयाबीनची 8 क्विंटल आवक झाली, त्यास 4000 ते 4200 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला.