Jalgaon Airport : खुशखबर…जळगाव ते पुणे विमानसेवा आता आठवड्यातून ‘इतके’ दिवस सुरू राहणार !

Jalgaon Airport : फ्लाय ९१ कंपनीच्या माध्यमातून जळगाव ते पुणे विमानसेवा सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर दोनच दिवस चालवण्यात आली होती. प्रतिसाद लक्षात घेऊन त्यानंतर जळगावहून पुण्याला आठवड्यातून चार दिवस नियमित विमानसेवा सुरू झाली होती. दरम्यान, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता जळगाव ते पुणे विमानसेवेची वारंवारता आता वाढविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात हालचालींना वेग देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Jalgaon Airport: Good news…Jalgaon to Pune flight service will now continue ‘so many’ days a week!
जळगाव ते पुणे विमानसेवा सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर २४ आणि २६ मे २०२४ रोजी चालवण्यात आली होती. त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता पुढे ती नियमित करण्यात आली होती. त्यानुसार २७ मे पासून जळगावहून पुण्याला आठवड्यातून चार दिवस नियमित विमान आता झेपावत आहे. जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू होऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटला आहे. दरम्यानच्या कालावधीत एकही दिवस पुण्याची फ्लाईट खाली गेलेली नाही किंवा खाली आलेली नाही. त्यामुळे जळगाव-पुणे विमानसेवा आठवड्यातून सहा दिवस करण्याच्या दृष्टीने विमान कंपनीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

जळगावहून पुण्याशिवाय गोवा तसेच हैदराबादसाठी यापूर्वीच नियमित विमानसेवा सुरू आहे. त्यानंतर आता मुंबईसाठीही विमान सेवा सुरू झाली आहे. जळगाव शहरासह परिसरातील प्रवाशांची त्यामुळे खूप मोठी सोय झाली आहे. खासगी बसेस आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमी वेळात मुंबई, पुणे, गोवा व हैदराबादला पोहोचणे शक्य झाले आहे. विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार तरूणांच्या वेळेची मोठी बचत जळगावहून सुरू झालेल्या विमानसेवेमुळे होत आहे. पुण्यात नुकत्याच सुरू झालेल्या कमर्शियल टर्मिनसमुळे जळगाव ते पुणे विमानसेवेची वारंवारता वाढण्याची शक्यताही आता बळावली आहे. जळगाव ते पुणे विमानसेवा आठवड्यातून सहा दिवस झाल्यास प्रवाशांचे खासगी बसेस तसेच रेल्वेवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button