जैन इरिगेशनतर्फे जळगाव शहर पोलीस ठाण्यातील कैद्यांसाठी सतरंजी व चादर भेट

Jain Irrigation : जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडतर्फे मानवतेच्या दृष्टीकोनातून राम नवमीच्या निमित्ताने जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधील कैद्यांसाठी अंथरण्यासाठी सतरंजी व पांघरूण म्हणून सोलापुरी चादरी पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, जैन इरिगेशनचे चंद्रकांत जैन, अनिल जोशी उपस्थित होते.

शहर पोलिस ठाण्याचे लॉकअपमधील तात्पुरत्या कैद्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून अंथरूण व पांघरूण पुरविण्यात यावे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जळगावच्या जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार जैन इरिगेशनकडून सदरच्या वस्तू शहर पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आल्यात.

फोटो ओळ : जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे शहर पोलिस ठाण्यातील कैद्यांसाठी निरीक्षक अनिल भवारी यांच्याकडे सतरंजी, चादर सुपूर्द करताना चंद्रकांत जैन, अनिल जोशी, दीपककुमार गुप्ता.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button