जैन इरिगेशन आणि जैन फार्मफ्रेश वातावरणातील कार्बनला बायोचारमध्ये रुपांतरीत करणार

Jain Irrigation : जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. (जे. आय. एस. एल.) ज्याचा नोंदणीकृत पत्ता एन. एच. क्रमांक 6, पो. ऑ. बॉक्स 72, जळगाव, महाराष्ट्र -425001, आणि जैन फार्म फ्रेश फुड्स लिमिटेड (जे. एफ. एफ. एफ. एल.) ज्याचा नोंदणीकृत पत्ता पोस्ट बॉक्स नं. 20, बांभोरी, जळगाव-425001 येथे आहे. या दोन्ही कंपन्या वातावरणातील कार्बनला बायोचारमध्ये रुपांतरीत करण्याचा प्रकल्प सुरू करणार आहेत.

नावीन्यपूर्ण अशा या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात आणि आंध्र प्रदेशात पिक काढणीनंतर शेतात उरलेल्या अवशेषांना जाळणे कमी होईल. सोबतच अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कचऱ्याची शाश्वत विल्हेवाट यामुळे लावता येईल. जैन इरिगेशन आणि जैन फार्म फ्रेश हा प्रकल्प ऐच्छिक कार्बन मार्केट स्टँडर्ड अंतर्गत विकसित करणार आहे. सर्व इच्छुक कर्मचारी, स्थानिक नागरिक, डीलर्स, पुरवठादार, शैक्षणिक संस्था, पर्यावरण आणि कृषी नियामक, स्वयंसेवी संस्था आणि इतरांनी या सभेला उपस्थित राहून आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ही भागधारकांची सभा दिनांक 23 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वाजता बडी हांडा हॉल, जैन ॲग्री पार्क, जैन हिल्स, शिरसोली रोड, जळगाव येथे आयोजित केलेली आहे. यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी किंवा वरील बैठकीशी संबंधित कोणत्याही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी भागधारक 0257- 2260288 या क्रमांकावर अथवा carboncredit@jains.com वर संपर्क साधू शकतात.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button