“जैन चैलेंज चषक” जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात

 जळगाव टुडे | जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगावद्वारे प्रायोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनद्वारे अधिकृत “जैन चैलेंज चषक” जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धा – २०२४ चे आयोजन दिनांक ०९ ते १० फेब्रुवारी २०२४ दरम्यान अनुभूती निवासी स्कुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात आले. १७ वर्षाच्या आतील वयोगटातील मुले व मुलींच्या एकूण ३३ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या शाळांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव कडुन बक्षिस म्हणुन आकर्षक चषक व खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी तसेच तायक्वांडो प्रशिक्षक अजित घारगे व बुद्धिबळ प्रशिक्षक सोमदत्त तिवारी यांच्या हस्ते देण्यात आले. स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक  किशोर सिंह यांनी मुख्य पंच म्हणून तर दीपिका ठाकूर, सुफयान शेख, ईशांत साळी, रौनक चांडक, आर्य गोला, हमजा खान, पुनम ठाकुर, फाल्गुनी पवार, जाजिब शेख, शुभम पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धेतील विजेते शाळांचे संघाना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगावचे अध्यक्ष  अशोक भाऊ जैन आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन यांनी  शुभेच्छा दिल्या.
अंतिम निकाल- 
१७ वर्षाआतील मुले
प्रथम स्थान:- पोदार इंटर नॅशनल स्कूल, चाळीसगाव
द्वितीय स्थान:- अनुभूती स्कुल (निवासी), जळगाव
तृतीय स्थान:- सेंट. टेरेसा हायस्कूल, जळगाव.
१७ वर्षाआतील मुली
प्रथम स्थान:- पोदार इंटर नॅशनल स्कूल, जळगाव
द्वितीय स्थान:- सेंट. लॉरेन्स हायस्कूल, जळगाव.
तृतीय स्थान:- तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव

WhatsApp Group

Related Articles

Back to top button