Indian Railways : रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; भुसावळ विभागातून धावणाऱ्या ३० रेल्वे गाड्या रद्द !
Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कळमना रेल्वे स्टेशन येथे राजनांदगाव ते कळमना दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कनेक्टिव्हिटीसाठी नॉन इंटरलॉकिंग कार्य सुरू करण्यात येत आहे. या कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या जवळपास ३० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या रद्द झालेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी आपले प्रवासाचे नियोजन यानुसार करावे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नॉन इंटरलॉकिंग कार्यामुळे कळमना स्टेशनवरील तिसऱ्या मार्गाची कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल, ज्यामुळे भविष्यातील रेल्वे वाहतुकीत अधिक कार्यक्षमता येईल. या तात्पुरत्या अडचणीमुळे भविष्यातील प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होण्यास मदत होईल. तरी प्रवाशांनी अधिक माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. Indian Railways
रद्द करण्यात आलेल्या मेल एक्स्प्रेस गाड्या व त्यांच्या तारखा पुढीलप्रमाणे
क्र. १२८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस- १० व ११ ऑगस्ट रोजी, क्र. १२८३३ अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस १३ व १४ ऑगस्ट रोजी. क्र. १२८६० हावडा – मुंबई गीतांजली एक्स्प्रेस ५, ७, ११ व १२ रोजी, क्र. १२८५९ मुंबई- हावडा गीतांजली एक्स्प्रेसः ७, ९, १३, १४ ऑगस्ट रोजी. क्र.१८०३० शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ११ ते १७ ऑगस्ट रोजी तर क्र. १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्स्प्रेस १३ ते १९ पर्यंत. क्र. २२८४६ हटिया-पुणे एक्स्प्रेस – ५ व ९ तर क्र. २२८४५ पुणे हटिया एक्स्प्रेस ७ व ११ रोजी. क्र. १२८८० भुवनेश्वर -लोकमान्य टिळक टर्मिनस ८ व १५ तर क्र. १२८७९ लो. टिळक टर्मिनस भुवनेश्वर एक्स्प्रेस – १० व १७ ऑगस्ट रोजी, क्र. १२८१२ हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १६ आणि क्र. १२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया एक्स्प्रेस १८ ऑगस्ट रोजी, क्र. १२२२२ हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेस- १५ रोजी. क्र. १२२२१ पुणे -हावडा दुरांतो एक्स्प्रेस – १७ रोजी. क्र. २०८५७ पुरी- साई नगर शिर्डी एक्स्प्रेस – ९ व १६ ऑगस्ट रोजी. क्र. २०८५८ साई नगर शिर्डी – पुरी एक्स्प्रेस ११ व १८ रोजी. क्र. १२९९३ गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस १६ रोजी तर क्र. १२९९४ पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस १९ रोजी.
क्र. २०८२२ संत्रागाची पुणे एक्स्प्रेस-१७ रोजी, क्र. २०८२१ पुणे – संत्रागाची एक्स्प्रेस १९ रोजी. क्र. २२८९४ हावडा साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ८ व १५ रोजी तर क्र. २२८९३ साईनगर शिर्डी – हावडा एक्स्प्रेस १० व १७ रोजी. क्र. २२९०५ ओखा शालिमार एक्स्प्रेस- १८ रोजी तर क्र. २२९०६ शालिमार ओखा एक्स्प्रेस २० रोजी. क्र. २२९७३ गांधीधामपुरी एक्स्प्रेस १४ रोजी आणि क्र. २२९७४ पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस १७ रोजी. क्र. २२८२७ पुरी-सुरत एक्स्प्रेस- ११ रोजी, क्र. २२८२८ सुरत-पुरी एक्स्प्रेस १३ रोजी. क्र. २०८२३ पुरी-अजमेर एक्स्प्रेस ५ व ८ रोजी. क्र. २०८२४ अजमेर- पुरी एक्स्प्रेस – ६, ८ आणि १३ रोजी रद्द राहील.