Indian Railways : भुसावळ विभागातील रेल्वे मार्गांच्या विस्तारीकरणासाठी सुमारे ८५० कोटी रूपयांची तरतूद !

Indian Railways : केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात यंदा मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील विविध मार्गांसाठी सुमारे ८५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये पाचोरा ते जामनेर तसेच धुळे ते नरडाणा, भुसावळ ते जळगाव चौथी लाईन, जळगाव ते मनमाड तिसऱ्या लाईनीच्या कामांचा समावेश आहे.

Indian Railways : Provision of about 850 crore rupees for the expansion of railway lines in Bhusawal section!
भुसावळ विभागाच्या रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे ते नरडाणा या ५०.६ किलोमीटरच्या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी यंदा ३५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पाचोरा ते जामनेर या ८४ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी ३०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. जळगाव ते मनमाड दरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या लाईनासाठीही १२० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या चौथ्या रेल्वेमार्गासाठी ४० कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.

दरम्यान, वाहतूक सुविधा निर्माण करण्याच्या कामांमध्ये गायगाव येथे लांब हॉल ट्रेनच्या हाताळणीसाठी यार्ड पुनर्संचनेकरीता ४.२५ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. निफाड येथील आरओबीमध्ये प्रस्तावित असलेल्या कामांसाठी पाच कोटी रूपये, भुसावळ ते बडनेरा दरम्यान साईड ट्रेनसाठी वेगळ्या अप आणि डाऊन मुख्य लाईनीवरील प्लॅटफार्मच्या कामांसाठी ११ कोटी रूपयांची तरतूद झाली आहे, अशी माहिती देखील इति पांडे यांनी दिली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button