Indian Railways : गितांजली, मुंबई मेल, सेवाग्राम, शालीमारला दोन जनरल डबे जास्तीचे जोडले जाणार !

Indian Railways : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये द्वितीय श्रेणीतील प्रवाशांसाठी जोडल्या जाणाऱ्या डब्यांची संख्या एक किंवा दोनच असते. साहजिक गर्दीच्या हंगामात सामान्य प्रवाशांना रेल्वेचा प्रवास करताना खूपच हाल सहन करावे लागतात. ही स्थिती लक्षात घेता भुसावळ विभागातून धावणाऱ्या सुमारे ३८ प्रवाशी गाड्यांना जास्तीचे दोन जनरल डबे आता जोडले जाणार आहेत. त्यात गितांजली तसेच मुंबई-हावडा-मुंबई मेल, मुंबई-नागपूर सेवाग्राम, शालीमार, अमरावती-मुंबई आदी एक्सप्रेस गाड्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

Indian Railways : Good news for passengers; Gitanjali along with Mumbai Mail, Sevagram Express will now add two additional general coaches!
साधारण नोव्हेंबर महिन्यापासून वाढीव जनरल डब्यांची सुविधा प्रवाशांना मिळू शकणार असून, तोपर्यंत गर्दीचा हंगाम देखील सुरू झालेला असेल. भुसावळ विभागातून धावणाऱ्या ३८ पैकी १४ गाड्यांना दोन जनरल डबे जास्तीचे जोडले जाणार आहेत. तर उर्वरित २४ गाड्यांना प्रत्येकी एक जनरल डबा जास्तीचा जोडला जाणार आहे.

दोन जनरल डबे जोडले जाणाऱ्या गाड्या
मध्य रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन जादा जनरल डबे जोडल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये मुंबई ते गोंदीया, लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस, लोकमान्य टिळक टर्मिनस ते पाटलीपूत्र, लोकमान्य टिळक टर्मिनस ते शालीमार, लोकमान्य टिळक टर्मिनस ते हावडा, लोकमान्य टिळक टर्मिनस ते पूरी, मुंबई-नागपूर-मुंबई सेवाग्राम, हावडा-मुंबई-हावडा मेल, हावडा-मुंबई-हावडा एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया, हावडा-अहमदाबाद, हावडा-मुंबई गितांजली एक्सप्रेस, रांची-लोकमान्य टिळक टर्मिनस, हटिया ते पुणे यांचा समावेश असणार आहे.

एक जनरल डबा जोडल्या जाणाऱ्या गाड्या
याशिवाय भुसावळ विभागातून धावणाऱ्या २४ प्रवाशी गाड्यांना प्रत्येकी एक जनरल डबा जास्तीचा जोडला जाणार आहे. त्यात मुंबई-अमृतसर, लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या, लोकमान्य टिळक टर्मिनस-बलिया-लोकमान्य टिळक टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर, लोकमान्य टिळक टर्मिनस-बल्लारशहा, लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर गोदान, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या, लोकमान्य टिळक टर्मिनस-सुलतानपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस-सीतापूर, लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रतापगड, लोकमान्य टिळक टर्मिनस-आग्रा कँट, लोकमान्य टिळक टर्मिनस-राणी कमलापती, पुणे-दानापूर-पुणे, मुंबई-अमरावती-मुंबई, पुणे-काजीपेठ-पुणे, पुणे-लखनऊ-पुणे, पुणे-जसडीह-पुणे, पुणे-लखनऊ-पुणे या एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button