जळगावहून सुरतला रेल्वेने जाताय…तुम्हाला ‘हा’ महत्वाचा बदल माहिती आहे का ?

जळगाव टुडे | रेल्वेने सुरत जाण्याच्या विचारात असलेल्या खान्देशातील प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. कारण, त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होणार असून, त्यांना सुरत जात असताना अलिकडे उधना स्थानकावरच उतरावे लागणार आहे. तेथून रिक्षा किंवा अन्य खासगी वाहन पकडून पुढे सुरत गाठावे लागणार आहे. त्यामुळे सुरत जाणार असाल तर माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करा,अन्यथा फजिती होऊ शकते. (Indian Railway)

प्राप्त माहितीनुसार, गुजरातमधील सुरत रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक चारवरील पुनर्विकासाची काही कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे भुसावळकडून सुरत जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या सहा गाड्या पुढील काही दिवस उधना स्थानकावरूनच सुटणार आहेत तसेच उधना स्थानकापर्यंतच जाणार आहेत. त्यात सुरत-भुसावळ एक्सप्रेससह सुरत-छपरा विशेष गाडी, सुरत-छपरा ताप्तीगंगा, सुरत-भागलपूर, सुरत-अमरावती या एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे.

नवीन बदलानुसार, 19007 भुसावळ-सुरत एक्सप्रेस 10 जून ते 07 सप्टेंबर दरम्यान उधना स्थानकातून 5.24 वाजता सुटेल. 19005 सुरत-भुसावळ एक्सप्रेस 10 ते 07 सप्टेंबर दरम्यान उधना स्थानकातून 11.30 वाजता सुटेल. 09065 सुरत-छपरा एक्सप्रेस 17 जून ते 02 सप्टेंबर दरम्यान उधना स्थानकातून सकाळी 8.35 वाजता सुटेल. 19045 सुरत-छपरा ताप्तीगंगा एक्सप्रेस 12 ते 06 सप्टेंबर दरम्यान उधना स्थानकातून सकाळी 10.20 वाजता सुटेल. 22947 सुरत-भागलपूर एक्सप्रेस 11 जून ते 07 सप्टेंबर दरम्यान उधना स्थानकातून 10.20 वाजता सुटेल. 20925 सुरत-अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 13 जून ते 06 सप्टेंबर दरम्यान उधना स्थानकातून दुपारी 12.30 वाजता सुटेल. याशिवाय उलट मार्गे भुसावळकडून सुरतकडे जाणाऱ्या वरील सर्व गाड्या निर्धारीत कालावधीत फक्त उधना स्थानकापर्यंतच धावतील.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button