Indain Railways : पुण्याला रेल्वेने जाताय; तुम्हाला ‘या’ काही गाड्या रद्द झाल्याचे माहिती आहे का ?

Indain Railways : पुणे विभागातील दौंड रेल्वे स्थानकावर प्रस्तावित असलेल्या महत्वाच्या कामांसाठी रेल्वेने येत्या २९ जुलै ते १ ऑगस्टच्या कालावधीत चार दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला आहे. अर्थात, त्यामुळे पुणे मार्गावर धावणाऱ्या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सहा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या उशिराने धावणार आहेत. त्यामुळे तुम्ही जळगाव-भुसावळहून पुण्याला रेल्वेने जात असाल तर माहिती घेऊनच घराबाहेर पडा.

Indain Railways : Going to Pune by rail; Did you know that some of these trains have been cancelled?
दौंड स्थानकावरील कामांमुळे रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये समावेश असलेली नांदेड ते पुणे एक्सप्रेस ३१ जुलै रोजी धावणार नाही. पुणे ते नांदेड एक्सप्रेस १ ऑगस्टला पुणे येथून सुटणार नाही. पुणे ते अमरावती एक्सप्रेस देखील १ ऑगस्टला पुण्यातून सुटणार नाही. अमरावती-पुणे एक्सप्रेसही १ ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे.

या गाड्यांचे मार्ग बदलले आहेत
वास्को-हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस ३१ जुलैला पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाडमार्गे धावणार आहे. हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्सप्रेस देखील ३१ जुलै रोजी मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, पुणे मार्गे वळविण्यात येणार आहे. याशिवाय हजरत निजामुद्दीन-हुबळी एक्सप्रेस २८ जुलै रोजी मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, कर्जत, पुणे, मिरज मार्गे धावणार आहे.

या गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे
पुणे-गोरखपूर एक्सप्रेस १ ऑगस्टला पुण्यातून दुपारी ४.१५ ऐवजी सायंकाळी ६.१५ वाजता सुटेल. पुणे-जम्मूतवी झेलम एक्सप्रेस १ ऑगस्टला सायंकाळी ५.५० ऐवजी रात्री ८.२० वाजता सुटेल. तसेच हजरत निजामुद्दीन-वास्को गोवा एक्सप्रेस ३१ जुलै रोजी पुणे विभागातून साडेतीन तास उशिराने धावणार आहे. लखनऊ-पुणे एक्सप्रेस ३१ जुलैला पुणे विभागातून अडीच तास उशिराने धावणार आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button