Yuva Sena : चाळीसगावची युवा सेना राज्यात इतिहास घडवेल : युवा सेना प्रदेश सदस्य सिद्धेश शिंदे यांचे प्रतिपादन

चाळीसगावात युवासेना संपर्क अभियानाचा शुभारंभ

Yuva Sena : राज्यात सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक ही चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात होणार आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने आज चाळीसगाव युवा संपर्क अभियान घेत आहोत. माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी भाजपाला लाथ मारून शिवसेनेत प्रवेश केल्याने एक उच्चशिक्षित अभ्यासू ,जनतेच्या विकासाची तळमळ असलेला तरुण येथून विधानसभेत पाठवायचा आहे. राज्याचे लक्ष असलेल्या या विधानसभा निवडणुकीत माझ्या युवा सैनिकांना इतिहास घडवण्याची संधी असून चाळीसगावची विधानसभा जिंकण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी, असे कळकळीचे आवाहन युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश शिंदे यांनी केले आहे.

Inauguration of Yuva Sena contact campaign in Chalisgaon

नवजीवन सिंधी समाज मंगल कार्यालयात युवा सेनेच्या युवा संपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रियंकाताई जोशी, दीपकजी दातीर, युवा सेना विभागीय सचिव विराज कावडिया, युवा सेना जिल्हा अधिकारी निलेश चौधरी, पियुष गांधी, विस्तारक भूषण मुलाने यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेशआबा चव्हाण, तालुका संघटक सुनील गायकवाड, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, उमंग परिवाराच्या संपदाताई पाटील, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख हर्षल माळी, जिल्हा समन्वयक रवीभाऊ चौधरी, तालुका प्रमुख किरण घोरपडे,महिला आघाडी तालुका प्रमूख सविताताई कुमावत, शहर प्रमुख कविताताई साळवे, उज्वलाताई जगदाने, युवती सेनेच्या दिपाली बाविस्कर, युवा सेना विस्तारक प्रवीण चव्हाण, स्वप्नाताई चौधरी, युवा सेना महानगरप्रमुख यश सपकाळ, रेल्वे प्रवासी सेनेचे किरण आढाव, उपशहर प्रमुख रामेश्वर चौधरी, महेंद्र जयस्वाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तालुका प्रमूख नकुल पाटील यांनी प्रास्ताविकातून चाळीसगाव शिवसेनेला पहिल्यांदा विधानसभेत आपला आमदार पाठविण्याची संधी मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेला येथून विधानसभेत प्रतिनिधी पाठविण्याची सुवर्णसंधी मिळत असून आमचे नेते उन्मेशदादा यांना उमेदवारी मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी युवा सेनेच्या स्टार प्रचारक प्रियंकाताई जोशी यांनी उन्मेशदादा यांच्या प्रवेशाने आमच्यासारख्या नवतरुणांना वेगळी ऊर्जा मिळाली असून जनतेच्या प्रश्नांचा सखोल असलेला अभ्यास व त्यासाठी प्रशासनाशी दोन हाथ करणारा एक उमदा शिवसैनिक राज्याला मिळाला आहे. त्यांना विधानसभेत निवडून आणण्यासाठी पुन्हा एकदा आपण कामाला लागावे. चाळीसगाव तालुक्यातील युवा सेनेची विशेष जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक दातीर यांनी देखील युवा सेनेला मेहनत करण्याची विनंती केली. हर्षल माळी यांनी आभार तर शैलेंद्र सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शहरप्रमुख रॉकी धामणे यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बारा बलुतेदार सेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ गोसावी, जेष्ठ नेते चांगदेव राठोड, भटक्या सेना तालुकाप्रमुख अनिल चव्हाण,आप्पा देवरे, मनोज कुमावत,नितीन सूर्यवंशी, राजू शेख, अहमद शेख, इक्बाल शेख निसार,शुभम हाके, संकेत सोनार, अजिंक्य बाविस्कर, जीवन राठोड, मिथुन राठोड, सागर पाटील, किरण भीमा गवळी, नीरज ठाकूर, निलेश कुमावत, परेश बागड, हितेश कुमावत, भैया मिस्त्री, सचिन भोई, एस.टी.सेना शहर प्रमुख सोनू अहिरे,समाधान काळे, निलेश देवरे, निलेशभाऊ देसले, भूषण काळे, अमीर शेख, मोहसीन खाटीक, इकबाल शेख, असलम शहा, नईम खाटीक, अहमद सय्यद, जुबेर खाटीक, इमरान खान,सलमान खान, गनी शहा, सुभाष राठोड,सामाजिक कार्यकर्तें नरेनकाका जैन, माधव रणदिवे,ऋतिक पाटील, मनोज गोत्रे, जयेश पाटील, रोहित भारती आदी मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button