Mahavikas Aghadi : जळगाव शहरात महाविकास आघाडीकडून बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेचा निषेध…!

Mahavikas Aghadi : बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज शनिवारी (ता.२४) जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून मूक आंदोलन केले. त्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह शिवसेना ठाकरे गट तसेच काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Mahavikas Aghadi : In Jalgaon, Mahavikas Aghadi condemns the incident of atrocities in Badlapur…!

उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला परवानगी नाकारल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेतृत्वाकडून मूक आंदोलन करण्याचे आवाहन प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना करण्यात आले होते. त्यानुसार जळगाव शहरातील कोर्ट चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शनिवारी दुपारी महाविकास आघाडीचे घटक पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्र्वादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांच्या वतीने बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे, शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन, जळगाव जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे तसेच शरद तायडे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, महिला आघाडी शहर अध्यक्षा मंगला पाटील, जळगाव शहराध्यक्ष एजाज मलीक, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. दरम्यान, काळ्या फिती लावून भर पावसात कोर्ट चौकात बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मूक आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीच्या संबंधित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनासह नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button