Jalgaon Gramin : जळगाव ग्रामीणमध्ये यंदा दोन गुलाबराव ज्या बाजुला त्यांचाच होणार विजय…!

-शिवसेना ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ यांचा दावा

Jalgaon Gramin : जळगाव ग्रामीण मतदारसंघात यंदा धनशक्ती विरूद्ध जनशक्तीची लढाई होत असून, दोन गुलाबराव एकमेकांसमोर उभे आहेत. मागील चार निवडणुकांमध्ये या मतदारसंघात तीन गुलाबराव होते. त्यापैकी दोन गुलाबराव ज्यांच्या बाजुला होते, त्यांचाच विजय आतापर्यंत झालेला आहे. यावेळच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर आणि मी स्वतः एका बाजुला आहे, तर शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील दुसऱ्या बाजुला आहेत. त्यामुळे यंदा गुलाबराव देवकरांचा विजय निश्चित आहे, असा दावा ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे.

In Jalgaon Gramin this year, two Gulabraos will win on their side…!

शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील स्वतःला पानटपरीवाला म्हणत असले, तरी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच पानटपरीवरून महालात बसवले. मात्र, त्याची कोणतीही पर्वा न करता पाटील यांनी ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप करून जनता त्यांना यंदाच्या निवडणुकीत धडा शिकवणार असल्याचे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी म्हटले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ तसेच विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश माणिक पाटील, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी गुरूवारी धरणगाव येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जळगाव ग्रामीणमधील शिंदे सेनेचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली.

मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीणच्या विकासाचा दावा करतात. मात्र, त्यांनी गटारी आणि रस्त्यांच्या पलिकडे कोणतीच ठोस कामे गेल्या २० वर्षांपासून केलेली नाहीत. धरणगाव तालुक्यात एकही मोठे धरण बांधलेले नाही की बेरोजगारांसाठी मोठा सहकारी कारखाना उभा केलेला नाही. धरणगावात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी १ कोटी ३४ लाख रूपये मंजूर आहेत. प्रत्यक्षात स्मारकाचे काम कंत्राटदाराला फक्त १६ लाखात दिले आहे. खुद्द नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्मारकाच्या कामाबद्दल काहीच माहिती नाही. यावरून दोन्ही स्मारकाचे काम कसे होईल कोण जाणे, अशीही शंका गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button