दिव्यांगांनी आपल्या दिव्यांगत्वावर मात करून जिद्दीने प्रगती करावी-गुलाबराव पाटील

दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक तीनचाकी सायकलींचे वाटप

Gulabrao Patil : दिव्यांगांना आधार देण्याची आमची सकारात्मक भूमिका असून त्यादृष्टीने काम करण्याचा प्रयत्न आही दिव्यांगांना सहायभूत साधने देवून प्रयत्न करीत आहोत. दिव्यांगानी राज्य व केंद्राच्या योजनांचा लाभ घेवून ई -बाईकचा वापर व्यवसायासाठी प्रामाणिकपणे करून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. तसेच दिव्यांगत्वावर मात करून जिद्दीने प्रगती करावी, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पाळधी येथील सुगोकी लॉनवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दर्जेदार प्रतीच्या इलेक्ट्रिक तीनचाकी सायकलींचे वाटप दिव्यांगांना करण्यात आले. याप्रसंगी मंत्री श्री. पाटील बोलत होते. प्रसंगी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मुंबई येथिल खाजगी सचिव अशोक पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख डी.ओ.पाटील, शिवराज पाटील, संजय पाटील सर, संगोयो चे अध्यक्ष गजानननाना पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, गोपाल चौधरी, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, देविदास कोळी, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, पी.एम.पाटील सर, नाना सोनवणे, दूध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील, सरपंच संघटनेचे सचिन पवार, शहर प्रमुख विलास महाजन, धनराज कासट, धोंडू जगताप, संदीप सुरळकर, शेतकी संघाचे ब्रिजलाल पाटील, डॉ. कमलाकर पाटील, रवि कापडणे , मोतीआप्पा पाटील यांच्यासह तालुक्यातील सरपंच , उपसरपंच व सदस्य , दिव्यांग बांधव, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

350 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक तीन चाकी सायकलींचे दिव्यांगांना वाटप
एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून 500 इलेक्ट्रिक तीन चाकी सायकली देण्याचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत 350 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक तीन चाकी सायकलींचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे . पुढील टप्प्यात उर्वरित ई सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button