चाळीसगावमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमात नवरदेवाच्या आईची पर्स लांबवली !

सुमारे ६७ हजार रूपयांचा ऐवज लंपास

जळगाव टुडे । जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात आयोजित साखरपुड्याच्या कार्यक्रमात नवरदेवाच्या आईची पर्स लांबवण्यात आल्याने सुमारे ६७ हजार रूपयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात सागर दिलीप पाटील यांनी तक्रार दिली असून, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ( Crime News )

Crime News
चाळीसगाव शहरालगतच्या करगाव शिवारात असलेल्या एका रिसार्टमध्ये सागर दिलीप पाटील यांच्याकडे साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच ठिकाणी नियोजित वर आणि वधू यांचे फोटो शूट सुरू असताना मुलाच्या आईची पर्स लांबवण्यात आल्याचा प्रकार घडला. फोटो काढण्यासाठी मुलाच्या आईने जवळची पर्स सोप्यावर ठेवली. मात्र, फोटो काढून आल्यावर पर्स सोफ्यावर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. २२ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल आणि सुमारे ४५ हजार रूपये रोख रक्कम ठेवलेली पर्स सोफ्यावर दिसून न आल्याने साखरपुड्याच्या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. पर्सची सगळीकडे शोधाशोध देखील करण्यात आली. मात्र, ती कुठेच आढळून आली नाही.

अज्ञात चोरट्याने एवढ्या गर्दीत सगळ्यांचा डोळा चुकवून पर्स लांबवल्याचे लक्षात येताच सागर दिलीप पाटील यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासाला वेग देऊन चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न देखील केला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button